breaking-newsमुंबईराष्ट्रिय

सलग 14 व्या दिवशी इंधनदरवाढ

मुंबई : इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारवर टीकेची झोड उठली असतानाच सलग चौदाव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागतच आहेत. पेट्रोलच्या दरात मुंबईत प्रतिलिटर 15 पैसे, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 17 पैशांनी वाढ झाली आहे.

मुंबईत पेट्रोलचे दर 85 रुपये 96 पैशांवर पोहचले आहेत. सलग होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांचा खिसा आणि डोकंही चांगलंच गरम झाले आहे. सरकारी पातळीवर इंधनदर कमी करण्याबाबत घोषणा होत असल्या तरी अंमलबजावणी शून्य असल्याचं दिसून येत आहे.

मोदी सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी इंधनदराबाबत लवकरच दीर्घकालीन उपाययोजना आखण्याचे आश्वासन दिले. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे देशात ठिकठिकाणी आंदोलने  होत आहेत. परंतु दरांवर नियंत्रण आणण्यात सरकारला आतापर्यंत यश आलेले नाही. देशात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल महाराष्ट्रात आहे. त्यातही अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल विकले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button