सर्व शाळा, सरकारी कार्यालयांसाठी योगदिवस पाळण्याच्या सूचना

पुणे – संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा आंततराष्ट्रीय योगदिवस म्हणून जाहीर केला असून राज्यातील सर्व शाळा तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हा योगदिवस साजरा करण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
या चौथ्या जागतिक योग दिनानिमित्त राज्यातील युवा वर्ग व सामान्य व्यक्तींना सामावून घेण्यासाठी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे सर्व स्तरांवर उत्सव, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यास सांगण्यात आले आहे. याबाबतची अधिक माहिती www.ayush.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या दिनानिमित्त प्रशिक्षण देण्यासाठी तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये लोणावळा येथील कैवल्यधाम, दि योगा इस्टिट्यूट ऑफ सांताक्रुझ, मुंबई व रमामणी अय्यंगार मेमोरियल योगा इस्टिट्यूट आदी संस्था प्रशिक्षण देणार आहेत. हा योग दिवस शाळांसोबतच सर्व शासकीय कार्यालयांनी साजरा करावा अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.