सरकारमुळे चार वर्षांमध्ये देशाची अर्थव्यवस्था सुधारली- अर्थमंत्री

नवी दिल्ली : गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारताची अर्थव्यवस्था सुधारली. भारत जगभरात ब्राईट स्पॉट म्हणजे लखलखता तारा म्हणून आता ओळखला जातो असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.
मोदी सरकारला 4 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जेटली यांनी अर्थव्यवस्था आणि भारतातील राजकीय स्थितीबाबत विविध विषयांवरील मत व्यक्त केले. फेसबूकवर त्यांनी यावर भाष्य करणारा ब्लॉग लिहिला आहे. ‘माय रिफ्लेक्शन्स ऑन द एनडीए गव्हर्नमेंट अफ्टर कंप्लिशन ऑफ फोर इयर्स इन पॉवर’ अशा मथळ्याने त्यांनी हा ब्लॉग लिहिला आहे.
या फेसबूक ब्लॉगमध्ये जेटली लिहितात, वस्तू आणि सेवा कर लागू करणे, नोटाबंदी, काळापैश्याविरोधात उचललेली पावले यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यास मदत झाली आहे. जेटली यांनी मुद्रा योजना, पीक विमा योजना आणि ग्रामिण भागातील रस्त्यांसाठी दिलेल्या निधीबाबतही यांनी लिहलं आहे.