breaking-newsराष्ट्रिय

सरकारची तेल कंपन्यांसोबत बैठक

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा केंद्र सरकारने धसका घेतला आहे. चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल कंपन्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व तेल कंपन्यांचे चेअरमन उपस्थित असतील.

ग्राहकांना तातडीने दिलासा देण्यासाठीच्या पर्यायांवर या बैठकीत चर्चा होईल. नवी दिल्लीत आज सायंकाळी पाच ते सहा वाजताच्या आसपास ही बैठक होणार आहे. त्यामुळे सरकार काय निर्णय घेते आणि ग्राहकांना आजच दिलासा मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 73 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 36 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68 रुपये प्रति लिटर झाले आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.

राजधानी दिल्लीत पेट्रोल आज 76.87 रुपये प्रति लिटर आहे, जो दर सर्वात महाग आहे. यापूर्वी सप्टेंबर 2013 मध्ये पेट्रोल 76.06 रुपये प्रति लिटर होतं. देशात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल महाराष्ट्रात आहे. सोलापूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 85.40 रुपये आहे. तर औरंगाबादमध्येही 85.36 रुपये प्रति लिटर दर आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button