breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरकारची आश्वासनं म्हणजे लबाडा घरच आवतन – अभिमन्यू पवार

पिंपरी ( महा ई न्यूज ) – देशाला स्वातंत्र्य मिळुन सत्तर वर्षे उलटली, तरीही मुलभुत गरजा सरकारला पूर्ण केलेल्या नाहीत.हि लाजिरवाणी बाब आहे. जग झपाट्याने पुढे जात असतांना आमचे नेते मात्र स्वतःचे कुटुंब आणि नातेवाईक यांनाच पुढे घेउन जाण्यात व्यस्त आहेत. त्यांना सामान्य माणसाच्या जगण्या-मरण्याच काहीही देणं-घेणं नाही. अशी माणसे आपण वर्षानुवर्षे निवडुन देत आहोत, जी अत्यंत स्वार्थी अन निर्लज्ज आहेत. त्यामुळे भाजप सरकारचे आश्वासन म्हणजे लबाडं घरचे आवतन आहे, अशी टीका संभाजी प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यु पवार यांनी केली.  पिंपरी येथे संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता मेळावा प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख उपस्थित पार पडला. यावेळी डॉ. शिवानंद भानुशे, इंजि सुजाताताई ठुबे उपस्थित होते. 
पवार म्हणाले की, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला कंटाळून जनतेने सत्ता परिवतर्न करून भाजपाला निवडुन दिले. पण त्याचा कारभार पाहून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. हे सरकार सगळ्यात लबाड सरकार असल्याच दिसुन आले. शेतकऱ्यांच्या मालाला हमी देऊ, शंभर दिवसांत मराठा, धनगर समाजाला आरक्षण देऊ म्हणाणारे देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आणि धनगर समाजाची फसवणूकच केली आहे. उलट यांच्या  काळात शेतीमालाचे भाव पडले. आणि शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांची  मुलं देखील आत्महत्या करु लागले आहेत, मराठा आरक्षणासाठी ४६ मराठा तरुणांनी आपला जीव दिला. याला सर्वस्वी फडणवीस सरकार जबाबदार आहे, या सरकारवर भादवी ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
शेती व्यवसाय तोट्यात आल्यामुळे आजचा तरूण शेती करायला तयार नाही, तरुणांना नोकऱ्या नाहीत त्यामुळे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढलेली असुन या तरुणांना योग्य दिशा मिळाली नाही तर देशात अराजकता माजेल. यामुळे यासर्व अडचणी सोडविण्यासाठी आम्ही राज्यातील सर्वसामान्य लोकांना सोबत घेऊन राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कारण, आम्ही आमच्या देशाची आर्थिक, सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक अधोगती होत असताना शांत बसुच शकत नाही. देशाला आणि राज्याला जाती, धर्म,पंथ विरहीत विकासाच्या महामार्गांवर घेउन जायचे असेल तर आता संभाजी ब्रिगेड शिवाय दुसरा पर्याय शिल्लकच नाही. कारण हा पक्ष समाजाचा सर्वांगीण विकास हेच ध्यान उराशी बाळगलेल्या  अत्यंत प्रामाणिक आणि उच्चशिक्षित तरुणांचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्या आवाहनाला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळत असुन येणाऱ्या निवडणुकांमध्ये संभाजी ब्रिगेड आपले उमेदवार उभे करणार असून त्याच्या पाठीशी आपण तन मन आणि धनाने उभे राहवे असे आवाहन पवार यावेळी यांनी केले.
तसेच प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख, प्रदेश प्रवक्ते डॉ.शिवानंद भानुशे यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष प्रविण कदम यांनी केले तर जिल्हा उपाध्यक्ष सुनिल साळुंके यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब चांदवडे, सचिव श्रिकांत गोरे, संघटक सुरज साळुंके, निलेश मुसळे, किरण माने, अक्षय मरबे, राजेश सातपुते,साहेबराव साळुंके, उपाध्यक्ष केशव पाटील परिश्रम केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button