breaking-newsमनोरंजन

सनी लिओनीचा कधीही न पाहिलेला अवतार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते. सनीने इंस्टाग्रावर शेअर केलेल्या फोटोमुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या फोटोतील तिचा लुक नेहमी पेक्षा वेगळा असून तिला ओळखणंही कठीण आहे. या फोटोमध्ये सनी प्रॉस्थेटिक मेकअपमध्ये दिसून येतेय. सनीने प्रॉस्थेटिक मेकअपमधील काही फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. सनी तिच्या आगामी सिनेमासाठी प्रॉस्थेटिक मेकअपची मदत घेत असून हा मेकअप करण्यासाठी अनेकदा चार ते पाच तास किंवा त्याहूनही अधिक वेळ लागतो.
‘तुम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या लुकमध्ये मी दिसणार आहे. माझ्या आगामी दमदार चित्रपटासाठी मी प्रॉस्थेटिक मेकअप करतेय,’ असे कॅप्शन सनीने एका फोटोला दिलेय. तर दुसऱ्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर कपड्याची पट्टी गुंडाळल्याचं दिसून येतय.तसेच या फोटोच्या कमेंटमध्ये तिने ‘मी स्वताला शोधते आहे, असही म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button