breaking-newsताज्या घडामोडीपुणे
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

पुणे– राज्य शासनाने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये पुण्यातील दोन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. म्हाडा पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी तर भूमि अभिलेख विभागाचे उपसंचालक कैलास जाधव यांची मुंबई येथे एमआयडीसी सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एम. जी. आऱ्हाड यांची महिला व बाल कल्याण विभागाच्या आयुक्तपदी, ए.ए.शिंगनारे यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी, एस.शंतनू यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे.