सचिन सावंत- आशिष शेलार यांच्यात तू-तू मैं- मैं

मुंबई – मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यात टि्वटरवर तू-तू मैं-मैं सुरू आहे. आशिष शेलार यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर टिप्पणी करणारे टि्वट केल्यानंतर सचिव सावंत यांनी त्यांना चांगलेच प्रत्त्युत्तर दिले आहे.
आशिष शेलार यांनी प्रथम टि्वट करत म्हटले की, ‘एक चव्हाण नांदेडच्या बाहेर पडत नाहीत.. दुस-या चव्हाणांना कराडच्या बाहेर कोण बोलवत नाहीत. संगमनेरच्या थोरातांचं कोण ऐकत नाहीत.. नेत्यांची उसणवारी करून उमेदवार लढत आहेत….’ शेलार यांनी काँग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य केल्यानंतर सचिन सावंत यांनीही तेवढ्याच त्वेषात टि्वटरवर शेलारांना उत्तर दिले.
सचिन सावंत यांनी शेलारांना उद्देशून टि्वट केले की, एक खडसे घराबाहेर पडत नाही… दुसरा पिस्तुल्या फायटींगशिवाय काही करत नाही…जालन्याच्या दानवेला शहाणा कोणी म्हणत नाही…शिवसैनिकांना घाबरत शेलारांना कोणी बोलवत नाही…विकास वेडा करून जुमलेबाज शहीदांनाही विकत आहेत…शहाण्या बापजाद्यांनी ६० वर्ष नाही दिली सत्ता #ChowkidarChorHai लोक म्हणत आहेत….
https://twitter.com/sachin_inc/status/1117338683948929024