breaking-newsमनोरंजन
‘संजू’तील ‘त्या’ सीनवर सेन्सॉरने लावली कात्री

राजकुमार हिरानी दिग्दर्शिक संजू सिनेमाचा ट्रेलर पाहून प्रेक्षक आता सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सेन्सॉर बोर्डाने संजू सिनेमाच्या काही दृश्यांवर कात्री लावली आहे. हिरानी यांनी संजयचं पूर्ण आयुष्य चपखलपणे रुपेरी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर अगदी थोड्याच वेळात तो सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल झाला होता.
मिडिया रिपोर्टनुसार, या सिनेमातील काही दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. सगळ्यात मोठे प्रकरण हे १९९३ साखळी बॉम्ब हल्ला हे आहे. या हल्ल्यावर अजूनही कोर्टात केस सुरू आहे. ट्रेलरमध्ये तुरुंगात त्याची विवस्त्र असताना तपासणी करण्यात येते. या दृश्यात रणबीर नग्नावस्थेत दाखवण्यात आला आहे. असे म्हटले जाते की सेन्सॉर बोर्ड या दृश्याला कात्री लावू शकते.