‘संजू’चा टीझर पाहून काय म्हणाले ऋषी कपूर बघा …

संजय दत्त याच्या जीवनावर आधारित ‘संजू’ या सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. या बायोपिकमध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारणार आहे. रणबीरच्या लूक्सचं आणि त्याच्या अभिनयाचं सगळेजण कौतुक करत आहेत. अशात अभिनेते ऋषी कपूर यांचीही या टीझरवर प्रतिक्रिया आलीये.
ऋषी कपूर यांची टीझरवरील रिअॅक्शन आयपीएलच्या क्लोजिंग सेरमनीवेळी पहिल्यांदा बघायला मिळाले. आयपीएल फायनलच्या पार्टीत रणबीर संजूच्या प्रमोशनसाठी आला होता. इथेच ऋषी कपूर यांनी ‘संजू’चा टीझर पाहिला आणि त्यानंतर त्यांच्या रिअॅक्शनचा व्हिडीओ समोर आला आहे.
या व्हिडीओत रणबीरचे कौतुक करत ते म्हणाले की, मला एका क्षणासाठी असे वाटले की, संजय दत्त स्क्रीनवर आहे. मुलाने खरंच खूप भारी काम केले आहे. मला त्याच्या अभिमान आहे. मला कळलेच नाही की, रणबीर आलाय. त्याने चांगले काम केले आणि आणखी चांगले करावे लागेल. असे सांगितले जात आहे की, हा व्हिडीओ राजकुसार हिराणी यांनी तयार केला. संजू हा सिनेमाचा ट्रेलर आता 30 मे रोजी रिलीज केला जाणार आहे.