Views:
204
– सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांचे आवाहन
पुणे । प्रतिनिधी
पुण्यात घेण्यात आलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले. शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे पुण्यात खबरदारीचा उपाय म्हणून सात दिवसांची रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेदरम्यान फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे.
कोरोनाला अटकाव घालण्यासाठी नागकिरांनी स्वयंस्फुर्तीने नियमांचे पालन केले पाहिजे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. वैध कारणांशिवाय फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्रीचे विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Like this:
Like Loading...