breaking-newsराष्ट्रिय
संघाची विचारधारा न मानल्यामुळेच तामिळींची हत्या होत आहे – राहुल गांधी

चेन्नाई – संघाच्या विचारधारेपुढे मान न तुकवल्यामुळेच आज तामिळींची हत्या होत आहे असा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तुतीकोरिन येथे कॉपर प्लान्टला विरोध करताना झालेल्या हिंसाचारात काल पोलिस गोळीबारात दहा जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्याच्या संदर्भात त्यांनी हा आरोप केला.
आज तामिळनाडुत या संबंधात दुसऱ्या दिवशीही हिंसक प्रकार झाले त्यावेळीही पोलिस गोळीबारात एक जण ठार झाला. त्या संबंधात राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकौंटवर म्हटले आहे की मोदी आणि आरएसएसच्या गोळीबाराने तामिळी जनता त्यांच्या पुढे कधीही मान तुकवणार नाही. तुतीकोरीन येथे झालेला गोळीबार हा सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याची टिपण्णी कालच राहुल गांधी यांनी केली होती.