breaking-newsआंतरराष्टीय

श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी आपल्यावर हल्ला करणाऱ्या एलटीटीई बंडखोरास क्षमा केली

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रिपाल सिरीसेना यांनी आपल्यावर हल्ला करणाऱ्या एलटीटीई बंडखोरास क्षमा केली आहे. त्यांनी खास अधिकाराचा वापर करून त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवराजा जेन्नीवन याला झालेली शिक्षा माफ केली आहे. शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात हे जाहीर करताना त्यांनी जेन्नीवनबरोबर हस्तांदोलनही केले.
सन 2005 मध्ये सिरीसेना यांच्यावर हल्ला करून शिवराजा जेन्नीवन याने त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात तो यशस्वी झाला नाही. 2006 साली पकडण्यात आलेल्या जेन्नीवनला त्या प्रकरणात 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. ही शिक्षा सिरीसेना यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली आहे.

मागील वर्षी राजपक्षे यांन पराभूत करून अध्यक्ष बनलेल्या सिरीसेना यांनी एका वर्षाच्या काळात अस्ल्पसंख्याक तामीळ जनतेचा विश्‍वास प्राप्त करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. विस्थापित तामिळींचे पुनर्वसन आणि त्यांच्या जमिनी परत करण्यासारखे महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले.

मात्र विरोधी पक्षांनी त्यांच्या या निर्णयांवर टीका केली आहे. हे निर्णय देशाच्या हिताला घातक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button