शेहला रशीदवर कारवाईची गडकरींची तयारी

- पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट केल्याचा आरोप
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कट राष्ट्रीय स्वयंसेवेक संघ आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे करत असल्याचा आरोप करणारे ट्विट केल्याप्रकरणी जेएनयुमधील माजी विद्यार्थी नेत्या शेहला रशीदविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तयारी नितीन गडकरी यांनी केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या धमकीच्या संदर्भाने आपल्याविरोधात अनिष्ट आरोप पसरवणाऱ्या समाजविघातक घटकांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.’ असे नितीन गडकरी यांनी ट्विटरवर म्हटले आहे.
माओवादी संघटनांमधील शुक्रवारी पुणे पोलिसांनी संभाषण पकडले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची “राजीव गांधी यांची हत्या जशी झाली तशी’ हत्या करण्याचा कट केला जात असल्याचे उघड केले होते. त्यानंतर शेहला रशीदकडून हे वादग्रस्त ट्विट केले आहे. माओवादी संघटनांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट पुणे पोलिसांनी उघड केल्यानंतर रशीदनी केलेल्या या ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करून आणि या हत्येचा मुस्लिम आणि कम्युनिस्टांवर करण्याचा कट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि संघ करत आहेत.असा आरोप केला होता.
मात्र नंतर शेहला रशीदनी नंतर आपल्या या वादग्रस्त ट्विटवर स्पष्टिकरण दिले आहे. आपण केवळ उपहासाने हे ट्विट केले होते, असे तिने म्हटले आहे. गडकरी यांनी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिल्यावर तिने आपले वादग्रस्त ट्विट मागे घेतले आहे.