breaking-newsमनोरंजन

शेतकऱ्यांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन रविनाचा ‘यू टर्न’

शेतकरी आंदोलनावर भाष्य करणाऱ्या अभिनेत्री रविना टंडनने स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या ट्वीटचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. शेतकऱ्यांना नाही, तर शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाल्याचं तिने सांगितलं.

शेतकरी आंदोलनाच्या एका बातमीवर कमेंट करत रविनाने ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये शेतमाल फेकून देतानाची दृष्य दिसत होती. “अतिशय क्लेशदायक घटना आहे. आंदोलनाची ही पद्धत भीषण आहे. सार्वजनिक संपत्ती, वाहतूक आणि साहित्याचं नुकसान करणं दुर्दैवी आहे. आंदोलकांना तातडीने अटक करावी आणि त्यांना जामीनही देऊ नये.”, असं ट्वीट रविना टंडनने केलं होतं.

Raveena Tandon

@TandonRaveena

There you go.someone was arguing with me on twitter that it was the dairy people themselves spilling the milk.whereas the article states “anti social elements did so.” No real farmer would let another human go hungry or waste their produce. https://twitter.com/the_hindu/status/1003599772438224896 

या ट्वीटनंतर रविना टंडनला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर रविनाने आपल्या ट्विटचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्यांना नाही, शेतमालाची नासधूस करणाऱ्या समाजकंटकांना अटक करा, असं म्हणाले असल्याचे स्पष्टीकरण रविना टंडनने दिले आहे.


Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button