breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा

कोल्हापूर : शेतक-यांच्या कर्जमाफीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना चांगलीच आक्रमक झाल. शेतकऱ्याचा सात-बारा कोरा करा, शेतीपंपाला २४ तास वीज द्या, मायक्रो फायनान्ससह अन्य कंपन्यांच्या जाचातून शेतक-यांना मुक्त करा आणि स्वामिनाथन समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा यासह अन्य मागण्यांसाठी आजस्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढणार आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणा-या या महामोर्चात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित रहातील असा दावा संघटनेनं केला आहे. या मोर्चाला स्वाभिमानीचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोतही उपस्थित रहाणार आहेत. त्यामुळं या मोर्चाकडं सगळ्याच्याच नजरा लागुन राहिल्या आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी आणि स्वाभीमानीचे नेते राज्यमंत्री सदाभाउ खोत यांच्यात गेल्या काही दिवसापासून मोठा दुरावा निर्माण झाला आहे. त्या  पार्श्वभुमीवर हे दोन्हीही नेते महामोर्चाच्या निमित्तानं एकत्र व्यासपीठावर दिसणार आहेत. त्यामुळं या मोर्चात नेमकं काय होतं. कोण कोणावर टीका करतो, हे पहाण औत्सुक्याचं ठरणार आहे. त्याचबरोबर खासदार राजु शेट्टी शेतक-यांच्या कर्जमाफीच्या मुद्यावर नेमकी कोणती भूमिका घेणार याकडं सगळ्यांचच लक्ष लागून राहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button