शिवसेनेसह भाजपच्या सर्व नाराज मित्रपक्षांना बरोबर घेण्याचा प्रयत्न- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : शिवसेनेसह भाजपच्या सर्व नाराज मित्रपक्षांना बरोबर घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहील, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
चव्हाण म्हणाले की, राज्यकर्त्यांकडून आज संसद, न्यायव्यवस्था व निवडणूक यंत्रणेचा गळा घोटला जात असल्यामुळे लोकशाही संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे भाजप विरोधात साऱ्या पक्ष संघटना एकत्रितपणे लोकसभेसह सर्व सार्वत्रिक निवडणुकांना सामोऱ्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही कार्यप्रणालीमुळे भाजपचे मित्रपक्ष तेलुगू देसम, बिजू जनता दल, अकाली दल, एवढेच नाहीतर त्यांचा जुना सहकारी पक्ष शिवसेनाही नाराजीतून सध्या नव्या वाटेवर आहे. या सर्वांना येत्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपविरोधी आघाडीत सामावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न राहणार आहे.