breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“शिवसेनेतर्फे पोलीस बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा”

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड पोलीस चौकीतील पोलीस अधिकारी तसेच सर्व कर्मचारी वर्ग यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी खासदार बारणे म्हणाले की, “गणेशोत्सव, नवरात्र व इतर सर्व सण शांततेत साजरे व्हावेत यासाठी सणासुदीतही सुट्टी न घेता आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीसांप्रती कृतज्ञता म्हणून शुभेच्छा देणे गरजेचे आहे. याकरिता मी स्वतः व माझे शिवसेनेचे पदाधिकारी आपणास शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी जशी पोलीस विभागाची आहे. तशीच आमची देखील आहे. आम्ही देखील सार्वजनिक जीवनात काम करणारे कार्यकर्ते आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. ”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, डॉ. दिलीप कामत, अनंत कोऱ्हाळे, बाळासाहेब वाल्हेकर, उमेश गोलांडे, विशाल गावडे, सुर्यकांत भोसले, विनायक माने, दर्शना संगमे, पोलीस मित्र संघटनेचे सुभाष मालुसरे, मधुकर साठे आदी मान्यवर उपस्थित होते.

नगरसेविका अश्विनी चिंचवडे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button