breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
शिवशाही व्यापारी संघटनेची महाराष्ट्राची कार्यकारिणी जाहीर

पिंपरी – शिवशाही व्यापारी संघटनेची महाराष्ट्र कार्यकारिणी आज सोमवारी (दि. 29) प्रदेश सचिव गणेश आहेर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.
पिंपरी येथील नारायण मेघाजी लोखंडे सभागृहात आयोजित कऱण्यात आलेल्या शिवशाही व्यापारी संघाच्या वतीने पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी शिवशाही व्यापारी संघाचे प्रदेशाध्यक्ष युवराज दाखले, प्रदेश उपाध्यक्ष गोरख पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष निलेश भोरे, खजिनदार माऊली जाधव, रोहिदास तांबे, शिवसेना उपविभागप्रमुख प्रमुख प्रदीप दळवी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मनोहर कानाडे (संत तुकाराम नगर विभागअध्यक्ष, शिवशाही संघटनेचे पि. चि. उपाध्यक्ष गणेश पाडुळे, दत्ता गिरी (थेरगाव विभाग अध्यक्ष), महिला आघाडीच्या सारिका तामचीकर (महीला सल्लागार) रत्नप्रभा नवगिरे, शिल्पा मरडेकर (चिंचवड विधानसभा महीला अध्यक्ष ) नरसिंग माने, आकाश घटकार, रविकिरण घटकार आदी उपस्थित होते.
शिवशाही व्यापारी संघाच्या पदाधिका-यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे –
महादेव काळे (लातुर जिल्हाध्यक्ष), विजय पिंगळ (नाशिक जिल्हाध्यक्ष), दिपक बिजेकर (दिंडोरी तालुकाध्यक्ष), गोगा सुपेकर (पुणे शहराध्यक्ष), सुनीता खंडाळकर (पुणे महिला शहराध्यक्ष), विशाल बाविस्कर (पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष), गणेश पाडोळे (पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष), बाळासाहेब गायकवाड (पिंपरी विधानसभा अध्यक्ष), सतीश भवाळ (पिंपरी विधानसभा उपाध्यक्ष), राज गिरी (चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष), भीमराव कुलकर्णी (खराळवाडी विभाग अध्यक्ष), कर्जत तालुकाध्यक्ष (सुहास ठाकरे), रंजत यादव ( मुंबई उपाध्यक्ष ), प्रफुल्ल भोसले (उल्हासनगर विभागाध्यक्ष), बलराम जाधवानी (उल्हासनगर विभागाध्यक्ष), प्रकाश जैन (ठाणे जिल्हाध्यक्ष), बबलू वाणी (संभाजीनगर पूर्व शहराध्यक्ष), नितीन देशमुख (संभाजीनगर पूर्व उपाध्यक्ष), सागर बनसोडे (संभाजीनगर मध्य शहराध्यक्ष), साजिद कुरेशी, मुश्ताक कुरेशी (संभाजीनगर मध्य उपाध्यक्ष), सय्यद सलाबउद्दीन (संभाजीनगर मध्ये शहर सचिव).