breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिवजयंतीच्या रात्री दगडफेक करणा-या आरोपींची भरचौकातून काढली धिंड

 

नाशिक : शिवजयंतीच्या रात्री पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आरोपींना चांगलाच धडा शिकविण्यात आला. नाशिकमधील देवळाली परिसरात आरोपींची चक्क धिंड काढण्यात आली. देवळाली परिसरात शिवजयंतीच्या रात्री त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. या घटनेत दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने देवळाली पोलिस हद्दीत कर्तव्यावर असताना संसरी येथील चारणवाडी येथील एका इसमाबरोबर भांडण होऊन ते पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले, यावेळी चारणवाडी येथील सोनू जाधव हातात दगड घेऊन आला आणि अमोल जाधवला म्हणाला की पोलीस नाईक आहेर यांच्या डोक्यात दगड घाल, अशी फिर्याद पोलीस नाईक पंढरीनाथ आहेर यांनी दिली.

आरोपींनी जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. दगड डोक्यास लागल्याने आहेर यांच्यासह पोलीस शिपाई मनोहर साळुंखे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. त्यांना उपचारासाठी देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कोणावर कारवाई?

या प्रकरणी चारणवाडी येथून संशयित आरोपी शंकर सुरेश देवकर, श्रावण माने,  रोहित कुसमाडे, दीपक नलावडे, गुंडाप्पा देवकर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित नऊ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सर्व आरोपींविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी यांनी कलम 307, 353 332, 333 ,141, 143,147 148,149, 120 ब आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button