breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
शिरुरमधील घटना, झोपडीला लागलेल्या आगीत तिघांचा होरपळून मृत्यू

- एका पुरुषासह चिमुकल्या मुलीचा होरपळून मृत्यू
शिरूर – शिरूर तालुक्यातील अमदाबाद गावात भिल्ल वस्तीतील एका झोपडीला भीषण आग लागली. या आगीत तिघांचा होरपळून मृत्यु झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश आहे.
लाला आनंद गावड(वय- 34), दादा लाला गावडे (वय- 4) व प्रांजल अरुण पवार (वय- 3) अशी मृतांची नावे आहे. आग एवढी भीषण होती की, तिन्ही मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला आहे.
भरउन्हात आग लागली. त्यात आज शिरूर लोकसभा मतदार संघात मतदान होते. त्यामुळे आगीची दुर्घटना कळण्यास उशीर झाला. मदतीअभावी आगीत तिघांचा होरपळून मृत्यु झाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग इतकी झपाट्याने वाढली की पीडितांना बाहेर पडण्याची देखील संधी मिळाली नाही. यात एका पुरुषासह त्याच्या चिमुकल्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला.