breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
शिरुरमधील ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचारात डमी विराट कोहली

शिरुर – शिरुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. सध्या सरपंच पदाची निवडणूक थेट लोकामधून होणार असल्याने उमेदवारांनी वेगवेगळी शक्कल लढविण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. यामध्ये श्री रामलिंग ग्रामविकास पॅनलकडून सरपंच पदासाठी विठ्ठल गणपत घावटे यांच्या प्रचारार्थ डमी विराट कोहली मैदानात उतरला आहे.
निवडणुकीचे मैदान कुठलेही असो, त्या मैदानात मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी उमेदवार नामी शक्कल लढवितात. यामध्ये शिरूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. प्रचाराची रणधुमाळीत रामलिंग पॅनलचा प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली मैदानात उतरला आहे. रामलिंग विकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा डमी विराट कोहली रामलिंग विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन करत आहे. डमी विराट कोहलीच्या रोड शोला नागरिकांनी विशेषत: तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या विराट कोहलीला पाहण्यासाठी, त्याच्याशी हात मिळवण्यासाठी तरुणांची ठिकठिकाणी मोठी गर्दी होवू लागली आहे. दरम्यान, रामलिंग विकास पॅनेलने पोस्टरवर विराट कोहलीचा फोटो टाकून प्रचारासाठी डमी विराट कोहली मैदानात उतरविला आहे.