breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शिक्षक वर्ग कामकाज प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण – मारुती भापकर

  • प्रत्येकी पाच लाख घेतल्याचा आरोप
  • मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

पिंपरी – महापालिकेच्या शिक्षण विभागामार्फत १६ शिक्षकांना महापालिकेत वर्ग करण्याच्या कामकाज प्रक्रियेत गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

यासंदर्भात भापकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ‘सीईटी’ परीक्षेत २०१० मध्ये पात्र झालेले प्राथमिक विभागातील १८ शिक्षक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार शिक्षण संचालकांच्या प्राथमिक विभागाने तसे १८ शिक्षक शिक्षण विभागाकडे वर्ग केले. त्यानुसार तत्कालीन आयुक्तांच्या नावे नोव्हेंबर २०१६ मध्ये पत्र आले होते. त्यावेळच्या शिक्षण मंडळाने जाताजाता या शिक्षकांना हजर करून घेण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता.

शिक्षकांचे ‘रोस्टर’ तपासले नाही, असे कारण देत प्रशासनाने हे शिक्षक हजर करून घेण्यास दिरंगाई केली. परंतु, खरे कारण हे तत्कालीन पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील अर्थ विषयक बोलणी फिस्कटल्याने त्या शिक्षकांना हजर करून घेण्यास विलंब केला जात होता. त्यामुळे ते शिक्षक पुन्हा न्यायालयात गेले. त्यानंतर महापालिकेत सत्तांतर होत राष्ट्रवाद-कॉंग्रेसची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भापकर यांनी केला आहे.

भाजपाची सत्ता आल्यानंतर या फेब्रुवारी १८ मध्ये १८ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांना हजर करून घेतले. यामध्ये एका शिक्षकामागे ५ लाख रुपये असा भाव फोडून भाजपा पदाधिकारी व प्रशासनातील अधिकाऱ्यांनी आपले हात ओले करून घेतले असल्याचा आरोप मारुती भापकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये गैरव्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी भापकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button