मुंबई । प्रतिनिधी
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवार निश्चित केले आहेत.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून अभिजित गोविंदराव वंजारी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुणे विभागीय शिक्षक मतदार संघातून जयंत दिनकर असगावकर यांची उमेदवारी काँग्रेसने जाहीर केली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.