breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
शिक्षकांच्या बदल्यांचा तिढा सुटेना

मुंबई : शिक्षकांच्या बदल्यांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. राज्यातील हजारो शिक्षक ‘विस्थापित’ झाले आहेत. म्हणजे या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. मात्र कोणत्या शाळेवर रुजू व्हायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
गत वर्षीपासून राज्यात शिक्षकांच्या बदल्या गाजत आहेत. राज्यातील शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांचा घाट ग्रामविकास विभागाने घातला. बहुतेक जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना बदल्यांचे आदेश मिळाले आहेत. मात्र या बदल्यांमधील रोज नवा गोंधळ समोर येऊ लागला आहे. दिलेल्या पसंतीक्रमानुसार शाळा मिळाल्या नसल्याची तक्रार शिक्षकांची आहे. त्याच वेळी बदली तर झाली आहे, मात्र कुठे रुजू व्हायचे माहीत नाही अशा संभ्रमात राज्यातील हजारो शिक्षक आहेत.त्यामुळे बदलीसाठी आनुषंगिक लाभ मिळालेले नाहीत.