शाहरुखला अक्षय कुमारमुळे “जोर का झटका’

शाहरुख खानच्या “सॅल्युट’मध्ये करीना कपूरची निवड फायनल झाली आणि या सिनेमाचे शुटिंग ऑगस्ट महिन्यात सुरू होणार होते. मात्र आता हे शुटिंग ऑगस्ट ऐवजी नोव्हेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. शाहरुख खानला करीना कपूर “जोर का झटका’ देऊ शकेल, असे वाटायला लागले आहे. कारण “सॅल्युट’मध्ये करीना शाहरुखच्या पत्नीच्या रुपात दिसणार आहे. तर दुसरीकडे करण जोहरच्या पुढच्या सिनेमामध्ये ती अक्षय कुमारची पत्नी असण्याची शक्यता आहे.
तैमूर लहान असल्याने तिने इतक्यात सिनेमात पुन्हा काम करण्यास नकार दिला होता. मात्र आता वर्षाला एकच सिनेमा करण्याचे तिने ठरवले आहे. त्यामुळे तिने “सॅल्युट’मध्ये शाहरुखची पत्नी बनण्याऐवजी करण जोहरच्या सिनेमामध्ये अक्षयची पत्नी बनण्याचा पर्याय स्वीकारल्याची चर्चा आहे.
एकतर करीना दोन्ही सिनेमे करेल किंवा शाहरुखच्या सिनेमाला नकार देईल. तसे केले तर शाहरुखला दुसरी हिरोईन शोधावी लागेल. तिने केलेल्या ब्लॉकबस्टर सिनेमांपेक्षा तिने नाकारलेल्या आणि नंतर हिट झालेल्या सिनेमांची यादीही मोठी आहे. तिने “कहो ना प्यार है’, “बाजीराव मस्तानी’, “ह्जम दिल दे चुके सनम’, “कल हो ना हो’, “राम लीला’, “पेज 3′, “चेन्नई एक्सप्रेस’, “ब्लॅक’, “क्वीन’ आणि “फॅशन’, “सारखे सिनेमे नाकारले आहेत.