पिंपरी / चिंचवड
शहर सुधारणा समिती सभापतीपदी सागर गवळी; क्रीडा समितीवर लक्ष्मण सस्ते

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका विषय समिती सभापतींची निवडणूक प्रक्रिया आज (शनिवारी) बिनविरोध पार पडली. चारही समितीच्या सभापतीपदी भाजपच्या नगरेसवकांची निवड झाली आहे.
विधी व न्याय समिती सभापतीपदी शारदा सोनवणे तर उपसभापतीपदी आश्विनी जाधव, शहर सुधारणा समिती सभापतीपदी सागर गवळी तर उपसभापतीपदी शैलेश मोरे, क्रीडा-कला- साहित्य व संस्कृती समिती सभापतीपदी लक्ष्मण सस्ते, उपसभापतीपदी बाळासाहेब ओव्हाळ आणि महिला बाल कल्याण समिती सभापतीपदी सुनीता तापकीर तर उपसभापतीपदी योगीता नागरगोजे यांची निवड झाली आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादीच्या निकिता कदम यांनी अर्ज दाखल केला होता. पंरतु, सत्ताधा-यांनी अर्ज माघे घेण्याचे आवाहन केल्यानंतर त्यांनी माघार घेतली. त्यामुळे सर्वंच समितीच्या सभापतींची बिनविरोध निवड झाली आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाचे सुनील पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.