breaking-newsताज्या घडामोडीपुणे

शहर राष्ट्रवादीने सणात पाहूणा आेढून काढला… !

 अपंग सेलच्या आंदोलनात भूजबळांच्या जामिनाचा आनंदोत्सव 

पिंपरी (विकास शिंदे) – पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॅाग्रेसने अपंगाच्या विविध मागण्यासाठी आज (शुक्रवारी) पिंपरीतील डॅा.बाबासाहेब आंबेडकर चैाकात आंदोलन केले. तसेच ऐनवेळी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या पदाधिका-यांनी अपंगाच्या आंदोलनाप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने त्याच आंदोलनात फटाके वाजवून आंदोत्सवही साजरा केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी आंदोलनाची संधी साधून घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी कॅाग्रेसने सणात पाहूणा आेढून काढल्याचे चर्चा सर्वत्र रंगली होती.

पिंपरीतील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात शहरातील अपंगाच्या 3 टक्के राखीव निधीतून अपंग बांधवाना त्यांच्या हक्कांच्या घराची निर्मिती व्हावी, याकरिता प्रयत्न करण्याऐवजी सत्ताधारी भाजपाने अपंग भवनाचा घाट घातला आहे. त्यांच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात येणार होते. याकरिता राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या शहर अपंग सेलच्या आंदोलनाची तयारी करण्यात आली होती. यावेळी महापालिकेने अपंगाच्या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्र सुरु करावे, महापालिका दवाखान्यात अपंगावरील उपचारासाठी स्वतंत्र कक्ष तयार करावा, अपंगाना हक्काच्या घरे आणि व्यवसायासाठी व्यापारी संकुल उभारावे, यासह आदी मागण्याकडे सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले आहे. या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने आंदोलन करुन सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करण्यात आला.

ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्याचे समजले. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, ज्येष्ठ नेते नाना लोंढे, प्रवक्ते फजल शेख, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, माजी नगरसेविका मंदा आल्हाट, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विजय लोखंडे, अशोक कुंभार, कविता खराडे, गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनीषा गटकळ, आनंदा यादव, यतिन पारेख, निलेश डोके, अरुणा कुंभार, शीला भोंडवे, शिल्पा बिडकर, शहजादी सय्यद, सलीम सय्यद, सविता धुमाळ, वंदना जाधव, उत्तम आल्हाट, प्रकाश आल्हाट, बाळासाहेब पिल्लेवार, रूपाली गायकवाड, महादेव वाघमारे, महेश वाघ, सुधाकर कांबळे, विजय शिंगे, राजू हिरवे, गाडेकर, बाबाजी चव्हाण, सुनील अडागळे आदी कार्यकर्ते आंनदोत्सव सहभागी झाले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button