शहरात वाळव्याच्या पावसाने लावली हजेरी, उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात आज (शनिवार) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वळवाच्या पावसाने हजेरी लावली. दुपारपासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. विजा कडाडून पावसाला सुरूवात झाली. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला.
पावसामुळे रस्ते निसरटे झाल्याने पिंपरी चौकात एक दुचाकीस्वार घसरून पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पिंपरीतील आंबेडकर चौकात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चौकात विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. पावसामुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
दुचाकीस्वारांनी आडोशाला थांबून पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. गेल्या चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे. आजच्या पावसामुळे काही अंशी गारवा निर्माण झाला आहे. उन्हाच्या काहिलीने व्याकूळ झालेल्या नागरिकांना हवेतील गारव्यामुळे दिलासा मिळाला.