breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात राष्ट्रवादीची कामगार परिषद, शरद पवार करणार मार्गदर्शन

  • संजोग वाघेरे यांच्याकडून मावळ लोकसभेची तयारी
  • कामगार परिषदेच्या माध्यमातून केले जाणार शक्तीप्रदर्शन

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदार संघातील कामगार वर्गाचे प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने शहरात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी कामगार परिषदेचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. 3) रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे ही परिषद होणार आहे. या परिषदेत पिंपरी-चिंचवड, मावळ मतदार संघातील कामगार उपस्थित राहणार आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीचा हा मेळावा म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे शक्ती प्रदर्शन मानले जात आहे.

कै. भिकू वाघेरे (पाटील) प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहराध्यक्ष वाघेरे यांनी कामगार परिषदेचे आयोजन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजप, शिवसेनेसह आता राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवारांनी कामाला सुरूवात केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ भाजप मावळ लोकसभेत फोडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (दि. 3) निगडीतील मदनलाल धिंग्रा मैदानावर विराट सभा होणार आहे. आणि याच दिवशी वाघेरे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत कामगार परिषद भरविण्याचे नियोजन केले आहे. या दिवशी दिग्गज व्यक्तींच्या शहरात सभा होणार आहेत. एकाच वेळी शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सभा झाल्यास कोणाच्या सभेला सर्वाधिक गर्दी जमा होणार त्यावरून मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी-चिंचवड शहरातले वातावरण संबंधित पक्षाला फेवर मानले जाणार आहे.

या कामगार परिषदेत पिंपरी-चिंचवड, भोसरी, तळेगाव, देहूरोड, लोणावळा, कामशेत, चाकण आदी भागातील एमआयडीसीमध्ये काम करणा-या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कोणती भूमिका घ्यावी लागेल, यावर शरद पवार भाष्य करणार आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कामगारांचे कसे हाल होत आहेत, यावर देखील पकाश टाकला जाणार आहे. तसेच, सरकारने इच्छाशक्ती दाखविल्यास कामगारांचे कोणते-कोणते प्रश्न सुटू शकतात, हे देखील पवार उलघडून सांगणार आहेत. एकंदरीत हा मेळावा म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादीचे शक्तीप्रदर्शन मानले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button