breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शहरात पे अॅण्ड पार्क धोरण राबविणार

पिंपरी-  महापालिका हद्दीत सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) धोरण राबविण्यात येणार आहे.  शहरात पार्किंगच्या जागांचे आणि वाहनांचेही वर्गीकरण करुन दरपत्रक निश्चित केले आहे. पे अॅण्ड पार्किंगमधून गावठाण भाग, झोपडपट्टींना वगळण्यात आले आहे. पार्किंग सुविधेचा वापर करण्यासाठी नागरिकांना मासिक पास दिले जाणार आहे. तसेच  सायकल, रुग्णवाहिका, दिव्यांगांची वाहने, मान्यताप्राप्त रिक्षा थांबे यांना सशुल्क पार्किंग मधून सवलत दिली जाणार असून लवकरच ‘पार्किंग अ‍ॅप’ विकसित करणार असल्याची माहिती स्थायी सभापती ममता गायकवाड यांनी दिली. दरम्यान, पार्किंग धोरणाला स्थायी समितीत मंजुरी देवून महासभेकडे शिफारस केली आहे.

शहरात वाहन पार्किंग व्यवस्थान नसल्याने हा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे. या प्रश्नावर कायमस्वरुपी उपाय काढण्यासाठी वाहनतळाचे धोरण तयार करण्यात आले आहे. त्याकरिता विविध शहराच्या अभ्यास करुन ही पार्किग पॉलिसीं राबविण्यात येत आहे. शहराची लोकसंख्या सुमारे 21 लाख असून वाहनसंख्या 16 लाख आहे.  त्यानूसार हे धोरण अवलंबिले जाणार आहे. त्यामुळे शहरात पार्कींगची समस्या जाणवू लागली आहे. त्यासाठी सर्वसमावेशक पार्कींग पॉलीसी राबविणे गरजेचे आहे.

रस्त्यावर पिवळे पट्टे आखून जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. पिवळ्या पट्टयाच्या आत वाहन उभे करणे बंधनकारक राहणार आहे. सर्व वाहनतळांवर फलक लावणे बंधनकारक असेल. या फलकांवर वाहनतळाचे दरपत्रक, वाहनतळाची क्षमता, कंत्राटदाराचे नाव व काही तक्रार करावयाची असल्यास तक्रारीसाठीचा दूरध्वनी क्रमांक असणार आहे.  सर्व वाहनतळांवर मासिक पासची सुविधा त्या – त्या वाहनतळांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पार्कींग पॉलीसी ठरविताना पार्कींग मागणीनुसार पार्कींग शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, शहर तीन झोनमध्ये विभागण्यात आले आहे. शहरात ज्या ठिकाणी दिवसभर 80 ते 100 टक्के पार्कीगची आवश्यकता आहे, असे ठिकाण झोन ‘अ’ (उच्च पार्कींग), ज्या ठिकाणी वाहन पार्क करण्याचे प्रमाण 60 ते 80 टक्के आहे, असे ठिकाण झोन ‘ब’ (मध्यम पार्कींग), ज्या ठिकाणी 40 ते 60 टक्के पार्कींगचे प्रमाण आहे, असे ठिकाण झोन ‘क’ (कमी पार्कींग) आणि ज्या ठिकाणी वाहने पार्क करण्याचे प्रमाण 40 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असे ठिकाण झोन ‘ड’ (कमीत कमी पार्कींग) म्हणून घोषीत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत झोन ‘ड’ पार्कींग धोरणातून वगळण्यात आले आहे. रस्त्यावरील पार्कींगसाठी झोन ‘अ’ मधील रस्त्यांकरिता एका मोटारीसाठी 1 ईसीएसकरिता दहा रूपये प्रति तास आकारण्यात येणार आहेत. निवासी पार्कींगसाठी रात्री अकरा ते सकाळी आठ या वेळेसाठी 25 रूपये प्रतिदिननुसार नऊ हजार 325 रूपयांचा वार्षिक परवाना देण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button