breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

शहरातील गु्न्हेगारीवर विधानपरिषदेत आवाज उठवा ; अपना वतनचे धनंजय मुंडेना साकडे

पिंपरी – शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणून अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदन देवून केली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सिद्दीकभाई शेख , अकीलभाई सय्यद, पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे आदी उपस्थित होते.
अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गाडयांची तोडफोड , खून, खुनाचा प्रयत्न, दहशत माजवणे, खंडणी वसूल करणे, महिलांवरील अत्याचार, तरुणींची छेडछाड अशा अनेक घटनांचे प्रमाण वाढत आहे.  शहरातील अवैध दारू धंदे व गुन्हेगारीवर नियंत्रण आणून ते बंद करावेत,  याकरिता २४ मार्च २०१८ रोजी निवेदन परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, साहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग, सतीश पाटील व पिंपरी-चिंचवड परिसरातील सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक याना देण्यात आले आहे. परंतू, दोन  महिने उलटल्यानंतर सुद्धा पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण नाही, तसेच अवैध दारू विक्री हॉटेल्सच्या माध्यमातून विनापरवाना मद्य विक्री, जुगार , मटका सर्रासपणे भर रस्त्यावर चालू आहेत.
याबाबत सर्व दारू धंद्यांची माहिती सुद्धा पोलिसांना माहिती आहे. परंतु ते जाणीवपूर्वक कारवाई करण्याचे टाळत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणावी,  पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करावेत, अवैध धंदयांना अभय देऊन हफ्तेवसूल करणा-या पोलिसांवर कारवाई करावी, आदी मागण्यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या वतीने आपण विधान परिषदेत आवाज उठवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button