breaking-newsराष्ट्रिय
व्हॉट्स अॅपवरील फेक मेसेज ‘त्या’ चौघांच्या जीवावर बेतला

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात तेलंगण आणि कर्नाटकमध्ये चार जणांची जमावाने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. व्हॉट्स अॅपवर फिरणारे फेक व्हिडिओ आणि खोट्या मेसेज हे त्या चौघांच्या जिवावर बेतले आहे.
तेलंगण, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये सध्या सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरत आहे. ‘मुलं पळवणाऱ्या टोळीपासून सावधान, या टोळीतील सदस्य एकेकट्याने परिसरात फिरत असून ते लहान मुलांचे अपहरण करत आहे’, अशा आशयाचे मेसेज फिरत आहेत. गेल्या आठवडाभरात कर्नाटक आणि तेलंगणमध्ये जमावाने चार जणांची हत्या केली. मुलं पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयातून जमावाने त्यांना अमानुषपणे मारहाण केली होती. या चारही घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आहेत.