व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये होणार वाढ

मुंबई : व्यवस्थापन क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या कौशल्य व क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ॲण्ड रिसर्च आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आणि व्यवस्थापन क्षमता वाढण्यासाठी मदत होणार आहे. खाजगी आणि सार्वजनिक उच्च शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांचा हा राज्यातील पहिला करार आहे. या कराराच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठांतर्गत चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. तसेच स्मॉल मेडियम इंटरप्रायझेसच्या (SME) सहकार्याने कोल्हापूर विद्यापीठामध्ये लघु व मध्यम कार्यकारी विकास कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच महिला उद्योजकांच्या गुणवत्ता वाढीसाठी कौटुंबिक व्यवसाय व्यवस्थापन कार्यप्रणाली हा नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. यामुळे उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होणार असून त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.