breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

व्यंकय्या नायडू नवे ​उपराष्ट्रपती; गोपाळकृष्ण गांधी पराभूत

नवी दिल्ली : एनडीएचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांनी यूपीएचे उमेदवार गोपाळकृष्ण गांधी यांचा धुव्वा उडवत दणदणीत विजय मिळवला आहे. नायडू यांना ५१६ इतकी भरघोस मतं मिळाली आहेत. तर, यूपीएचे गोपाळकृष्ण गांधी यांच्या पारड्यात अवघी २४४ मतं पडली आहेत. ​ आहेत. म्हणजेच नायडू यांनी गांधी यांचा २७२ मतांनी पराभव केला आहे. एकूण मतांपैकी ११ मतं अवैध ठरली आहेत.
देशाच्या तीन मोठ्या घटनात्मक पदांवर भाजपचे नेते विराजमान होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी झालेल्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला होता. विद्यमान उपराष्ट्रपती हामीद अंसारी लागोपाठ दोन वेळा या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांचा सध्याचा कार्यकाल १० ऑगस्ट या दिवशी समाप्त होत आहे.
आज झालेल्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवणुकीत एकूण ९८.२१ टक्के मतदान झाले. निवडणुकीत एकूण ७८५ खासदारांना मतदान करायचे होते, मात्र त्यांपैकी ७७१ खासदारांनी मतदान केले. १४ खासदारांना मताधिकार वापरता आला नाही. मतदान सकाळी १० वाजता सुरू झाले आणि संध्याकाळी ५ वाजता बंद झाले.

 नायडूंचे सर्वच पक्षांशी चांगले संबंध
नायडू हे आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. नायडू यांनी मंत्री म्हणून काँग्रेससह सर्वच पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित केले होते. जीएसटीसाठी विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी ते काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी देखील गेले होते. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीही ते सोनियांना भेटले होते. राज्यसभेत सध्या एनडीएचे बहुमत नाही. विरोधकांशी असलेल्या चांगल्या संबंधांचा फायदा त्यांना राज्यसभेचे कामकाज चांगले चालवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो. उपराष्ट्रपति हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
दक्षिण भारतात पक्षाचा विस्तार
दक्षिण भारतातील भाजपनेते व्यंकय्या नायडू उपराष्ट्रपती बनल्याने आता दक्षिण भारतातील राज्यांमधील भाजपची लोकप्रियता वाढणार आहे. २०१६ च्या निवडणुकीत नायडू यांनी तामिळनाडूत मोठा प्रचार केला होता. शिवाय ते कर्नाटक आणि केरळ राज्यांमध्ये देखील गेले होते. तामिळनाडूत विविध योजना राबवण्यासाठी ते नेहमी आग्रही असत. दक्षिण भारतात हिंदी भाषा लागू करण्याबाबतच्या वादात क्षेत्रीय भाषांना प्राथमिकता देण्याचेही त्यांनी समर्थन केले होते.
अभाविप ते राष्ट्रीय राजकारणपर्यंतचा प्रवास
आंध्र प्रदेशचे असलेले नायडू १९६७ मध्ये युवक विद्यार्थी नेता म्हणून अभाविपचे काम पाहत होते. पुढे १९७३ पासून ते जनसंघाचे काम करू लागले. जनसंघात ते राष्ट्रीय अध्यक्ष आणि नंतर केंद्रीय मंत्री बनले. दिल्लीत आल्यानंतर ते लालकृष्ण आडवाणी यांच्या सानिध्यात आले. हळूहळू ते टीम आडवाणीचा भाग बनले. प्रसारमाध्यमांशीही त्यांचे चांगले संबंध आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button