ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय क्षेत्रातील कामगिरीबद्दल डॉ. विशाल ढोमसे यांचा गौरव

  • पद्‌मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्याहस्ते सत्कार
  •  “ओआययूसीएमइडी’ तर्फे पीएच.डी. प्रदान
पिंपरी- दी ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर मेडिसिन्स्‌ (ओआययूसीएमइडी) च्या वतीने डॉ. विशाल ढोमसे यांना पीएच.डी. (Hon Cosa) प्रदान करण्यात आली.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी व्यवसाय सुरु केला. त्यामाध्यमातून वे-टू हेल्थ प्रा. लि., रुबी एलकेअर प्रा. लि., ऍशलॉन मेडिकल सर्व्हिसेस, राड डायग्नोस्टिक्‍स प्रा. लि., व्हीनस लिझर्स आणि प्लॅटिनम प्रॉपर्टीज या नामांकित कंपन्यांची स्थापना केली आहे. गेल्या 16 वर्षांपासून डॉ. ढोमसे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
तसेच, सुयोग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून डॉ. ढोमसे यांनी विविध सामाजिक उपक्रमांत सहभाग घेतला आहे. विशेष म्हणजे, देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले आहे. दरम्यान, बिहारचे राज्यपाल व शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांनी डॉ. विशाल ढोमसे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल गौरव केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button