breaking-newsपिंपरी / चिंचवड
वीज नियामक आयोगाने निश्चित केलेले दर कायम ठेवा ; मुख्यमंत्र्याकडे लघु उद्योग संघटनेची मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज )- वीज नियामक आयोगाने निश्चित केलेले सध्याचे वीजदर कायम ठेवण्याबाबत व अन्य संबंधित मागण्या मान्य करण्यात याव्यात अशी मागणी पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेने आज मुख्यमंत्री यांच्याकडे केली.
पिंपरी चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी विविध मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना चिंचवडमध्ये दिले. वीज दरवाढ रद्द करून वीज नियामक आयोगाने निश्चित केलेले सध्याचे वीजदर कायम ठेवण्याबाबत व अन्य संबंधित मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी निवेदनांद्वारे केली.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, महावितरणचे आयोगाने निश्चित केलेले औदोगिक वीजदर सध्याच शेजारील सर्व राज्याच्या तुलनेत 25 टक्के ते 35 टक्केने जास्त आहेत या मध्ये पुन्हा सरासरी २२ टक्के दरवाढ लादणारा व येत्या 2 वर्षात ग्राहकांवर 30842 कोटी रु.ची जादा वसुली लादणारा प्रस्ताव महावितरण ने आयोगासमोर दाखल केला आहे .ही दरवाढ राज्याच्या विकासासाठी घातक ठरणारी आहे .त्यामुळे ही संपूर्ण दरवाढ रद्द करावी. अन्य राज्याच्या तुलनेत आपला उत्पादन व वितरण खर्च प्रचंड आहे. हा सर्व अतिरिक्त बोजा हा वीज कंपनीची अकार्यक्षमता ,अवाढव्य भांडवली खर्च , अवाढव्य प्रशासकीय खर्च ,वीज चो-या वितरण गळती या मुळे आहे .हा अतिरिक्त बोजा पूर्णपणे रद्द करणे ग्राहकाच्या व राज्याच्या हिताचे आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.