breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
विष प्यायलेल्या मराठा आंदोलकाचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद – मराठा आरक्षणासाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चानं पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मराठवाड्यात हिंसक वळण लागले होते. यादरम्यान, जगन्नाथ सोनावणे (वय 55 वर्ष) या आंदोलकानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
औरंगाबादमधील देवगाव रंगारी येथे आंदोलनादरम्यान सोनावणे यांनी लासूर टी पॉइंटवर विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (24 जुलै) सकाळी 10.30 वाजता घडली. यानंतर तातडीनं जगन्नाथ यांना देवगाव रंगारी येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, मंगळवारी सहा आंदोलकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.