breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विषय समित्यांची निवड बिनविरोध?; माधुरी कुलकर्णी, स्वनिल म्हेत्रे, सीमा चौगुले, संजय नेवाळे यांचे अर्ज दाखल

पिंपरी – महापालिकेच्या विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा आणि क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक या चार विषय समितीची सभापतीपदी भाजप नगरसेवकांची निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विधी समितीसाठी माधुरी कुलकर्णी, महिला व बाल कल्याण समितीसाठी स्वनिल म्हेत्रे यांनी, शहर सुधारणा समितीसाठी सीमा चौगुले यांनी तसेच क्रीडा समितीसाठी संजय नेवाळे यांनी सत्ताधारी भाजपकडून शनिवारी अर्ज दाखल केले.

येत्या गुरुवारी (दि.10 मे) होणार आहे. यावेळी समाज कल्याण आयुक्त मिलींद शंभरकर हे पीठासन अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विधी समिती, महिला व बाल कल्याण समिती, क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती, आणि शहर सुधारणा समितीमध्ये नवीन नगरसेवकांची 20 एप्रिलच्या महासभेत निवड करण्यात आली. महापालिकेतील तैालनिक पक्षीय बलाबलानुसार सत्ताधारी भाजपाचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन आणि शिवसेनेचा एक अशी सदस्यांची विषय समितीत निवड करण्यात आली.

यामध्ये विधी समिती:- माधुरी कुलकर्णी, मनीषा पवार, उषा ढोरे, राजेंद्र लांडगे, वसंत बोराटे (भाजपा), सुमन पवळे, संगीता ताम्हाणे, निकिता कदम (राष्ट्रवादी काँग्रेस), सचिन भोसले (शिवसेना)महिला व बाल कल्याण समिती:- हिराबाई घुले, आरती चोंधे, उषा मुढे, निर्मला कुटे, स्वीनल म्हेत्रे (भाजप), मंगला कदम, स्वाती काटे, वैशाली काळभोर (राष्ट्रवादी काँग्रेस), मीनल यादव (शिवसेना)क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती:- अंबरनाथ कांबळे, शैलेश मोरे, सुजाता पालांडे, संजय नेवाळे, अश्विनी बोबडे (भाजप), अनुराधा गोफने, अपर्णा डोके, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी वाघमारे (शिवसेना), शहर सुधारणा समिती:- सीमा चोघुले, माया बारणे, सुरेश भोईर, कमल घोलप, निर्मला गायकवाड (भाजप), वैशाली घोडेकर, सुलक्षणा धर, उषा वाघेरे (राष्ट्रवादी काँग्रेस), निलेश बारणे (शिवसेना) या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button