breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

विरोधकांनो, संघाविरोधात एक व्हा: गांधी

दिल्ली : ‘आपल्या विचारधारेवर देशात निवडणुका जिंकता येणार नाहीत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला माहीत आहे. म्हणूनच देशातील महत्त्वाच्या संस्थांवर संघाची माणसं बसवण्याचं काम सध्या सुरू आहे. पण सर्व विरोधक एकत्र आल्यास भाजप आणि संघ कुठेच दिसणार नाहीत. त्यामुळं सर्व विरोधकांनी यांच्याविरोधात एकत्र यावं,’ असं आवाहन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज केलं.
संयुक्त जनता दलातून निलंबित करण्यात आलेले खासदार शरद यादव यांच्या ‘साझी विरासत’ कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी राहुल यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. सर्वसाधारणपणे देशाकडं बघण्याचे दोन दृष्टिकोन असतात. एक देश माझा आहे आणि मी देशाचा आहे. मात्र, आरएसएसची विचारधारा ‘हा देश आमचा आहे आणि तुम्ही या देशाचे नाहीत,’ अशी आहे. जोवर देशात सत्ता नव्हती तोवर आरएसएसनं कधीही तिरंगा फडकवला नव्हता. सत्ता आल्यानंतर ते तिरंगा फडकवू लागले आहेत,’ असा टोलाही राहुल यांनी हाणला. सरसंघचालक मोहन भागवत यांनी केरळमध्ये ध्वजारोहणास मनाई करण्याच्या घटनेकडं त्यांचा रोख होता.
‘तामिळनाडूमधील शेतकरी आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर नग्न बसले आहेत. पण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत सांगता कर्जमाफी करणं हे आमचं धोरण नाही, शेतकरी मेले तर आम्हाला काही फरक पडणार नाही. देशातील प्रत्येक राज्यातील शेतकरी रडतोय. याचं केंद्रातील सरकारला काहीही सोयरसुतक नाही. कारण, हे शेतकरी या देशातील आहेत असं हे सरकार मानतच नाही. हा देश केवळ १५ ते २० उद्योगपतींचा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याऐवजी मोदींनी गेल्या दोन वर्षात १५ ते २० उद्योगपतींचं १ लाख ३० हजार कोटींचं कर्ज माफ केलं आहे, असा आरोप राहुल यांनी केला. सत्तेत येण्याआधी भाजपनं मतदारांना अनेक आश्वासनं दिली होती. १५ लाख रुपये खात्यात जमा करू, रोजगार देऊ, नोकरी देऊ, त्याचं पुढं काय झालं, असा सवालही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button