breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरोधकांच्या निषेधार्थ खासदार साबळे यांचे कोल्हापूरात उपोषण

पिंपरी- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज विरोधकांनी करु न दिल्याने त्यांच्या निषेधार्थ सत्ताधारी भाजप खासदार उपोषण करत आहेत. पिंपरी-चिंचवडमधील राज्यसभेचे भाजप खासदार अमर साबळे यांचे आज (गुरुवारी) कोल्हापुरात उपोषण सुरू आहे. तेथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण ते करत आहेत.
लोकसभेच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनाच्या काळात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी गोंधळ घातला. त्यामुळे अधिवेशनाच्या दुस-या सत्रात लोकसभेचे 8 टक्के, तर राज्यसभेचे अवघे 4 टक्के कामकाज चालले. अधिवेशनावर 190 कोटी खर्च झाला. मात्र, खर्च होऊनही कामकाज होऊ न शकल्याने भाजपने हे उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्याचाच भाग म्हणून खासदार साबळे यांचे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत.
साबळे यांच्या एक दिवसाच्या लाक्षणिक उपोषणात आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, संदीप देसाई, विजय जाधव, हिंदूराव शेळके, के. एस. चौगले, संतोष भिवटे, विजय अगरवाल, सुरेश जरग, सयाजी अळवेकर, अशिष कपडेकर, हेमंत अराध्ये, सुभाष रामुगडे, रामचंद्र घाडगे, ऊलपे यांच्यासह तेथील स्थानिक भाजपचे पदाधिकारी लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button