breaking-newsक्रिडा

विराटने पत्नी अनुष्कासह पंतप्रधान मोदी आणि धोनीला दिलं ‘हे’ चॅलेंज

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी दिलेलं ‘फिटनेस चॅलेंज’ स्वीकारलं आहे.  ‘मी राज्यवर्धन राठोड सरांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे, आणि आता मी माझी पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांना चॅलेंज करतोय’, असं ट्वीट विराटने केलं आहे.

क्रीडा मंत्री राठोड यांनी फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करत त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. त्यांचं हे चॅलेंज कोहलीने पूर्ण करुन स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

 

Virat Kohli

@imVkohli

I have accepted the by @ra_THORe sir. Now I would like to challenge my wife @AnushkaSharma , our PM @narendramodi ji and @msdhoni Bhai for the same. 😀

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button