विनयभंग प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल

पिंपरी– चारचाकी मोटारीला धडक दिल्याच्या कारणावरून मोटार चालकाने दुचाकीचालक महिलेचा विनभंग केला. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरासमोर बुधवारी रात्री बाराच्या सुमारास घडली.
दर्शन लोढा आणि स्वरूपा लोढा (रा. यामुनानगर, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अंजू दयाल सुखेजा (वय २३, रा. कुदळे कॉलनी, पिंपरी) यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजू या दुचाकीवर जात होत्या. दर्शन लोढा यांनी त्यांना रस्त्यात अडवून माझ्या मोटारीला का धडक दिली. असा जाब विचारून शाब्दिक बाचाबाची केली. दर्शन यांनी अंजू यांच्याशी अश्लील भाषेत बोलून शिवीगाळ केली. त्यांच्याशी झटापट करून त्यांचा विनभंग केला. स्वरूपा यांनी बघून घेण्याची धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद आहे. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.