breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचा राष्ट्रवादीला पाठिंबा

पनवेल: स्थानिक स्वराज्य विधान परिषदेची निवडणूक २१ रोजी पार पडत असून या निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला उघड पाठिंबा दिला आहे. मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे व भाजपा रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल उघडपणे एकमेकांची भेट घेतली. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ९४१ मतदारांना या निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे.

निवडणुकीत सेनेचे राजीव साबळे हे सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना आव्हान देत आहेत. राज्यात भाजपा-सेना एकत्र असताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला हा मोठा झटका मानला जात आहे. पालघर लोकसभा निवडणुकीत सेनेने वनगा कुटुंबीयांचा पक्ष प्रवेश करून त्यांच्या मुलाला उमेदवारी दिल्याने भाजपामध्ये नाराजी पसरली होती. कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेत सेना-भाजप यांची अघोषित युती झाली होती.

मात्र शेवटच्या क्षणी भाजपाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने सेनेला मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते पनवेलमध्ये तळ ठोकून बसले होते. पनवेल उरणमध्ये एकूण ११८ मतदार असून, संपूर्ण मतदान राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. पनवेलमधील शेकाप नगरसेवक मतदानासाठी थेट गोव्यावरून पनवेलमध्ये दाखल झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button