विधानपरिषद निकाल : सेना, भाजप प्रत्येकी २ जागी विजयी, काँग्रेसला धक्का

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडण्यात येणाऱ्या विधानपरिषदेच्या सहापैकी रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, परभणी-हिंगोली, अमरावती आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या पाच जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. तर लातूर-बीड-उस्मानाबाद या मतदारसंघाचा निकाल हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राखून ठेवला आहे. त्यामुळे या जागेची मतमोजणी लांबणीवर पडली आहे. या सर्व मतदारसंघात सोमवारी २१ मे रोजी मतदान झालं.
LIVE UPDATE
नाशिक– राष्ट्रवादी-भाजपला धक्का, शिवसेनेचे नरेंद्र दराडे विजयी, दराडेंना 412 तर राष्ट्रवादीचे शिवाजी सहाणे यांना 219 मतं
नाशिक – नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दराडे आघाडीवर
परभणी-हिंगोली – शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी (256 मतं), काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा पराभव (221)
चंद्रपूर – भाजपचे रामदास आंबटकर विजयी – आंबटकर यांना 550 मतं, काँग्रेसच्या इंद्रकुमार सराफयांना 462 मतं.
अमरावती – भाजपाचे प्रविण पोटे विजयी (458 मतं), काँग्रेसच्या अनिल मधोगरिया यांचा पराभव
9.00 AM अमरावती: मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच भाजपाचे उमेदवारी प्रवीण पोटे यांचे विजयांचे बॅनर लागले.
8.00 AM विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात