breaking-newsपुणेमहाराष्ट्र

विद्यार्थीनीवर बलात्कार प्रकरणी नराधम शिक्षकाला अटक

  • अश्लील छायाचित्र काढून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी 

अभ्यास घेण्याच्या नावाखाली विद्यार्थीनीवर बलात्कार करून अश्लील छायाचित्र काढल्याचा धक्कादायक प्रकार शिक्रापूर येथून उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्थानिक युवकांनी शिक्षकाला चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पीडितेच्या आईने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

आबासाहेब जानकर (वय 31, रा. मुढाळे, ता. बारामती, जि. पुणे), असे अटक केलेल्या आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानकर हा पीडित विद्यार्थीनीचे अश्लिल छायाचित्रे काढून तिला ब्लॅकमेल करीत होता. त्याने पीडित मुलीला अभ्यासाच्या नोट्स देण्याच्या बहाण्याने त्याचा शिक्षक मित्र जाधव (रा. जातेगाव बुद्रूक) याच्या खोलीवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच तिचे अश्लील छायाचित्र काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर जानकर याने शाळेच्या लॅबमध्ये, स्वतःच्या घरी नेऊन तीन वेळा मुली सोबत अश्लील वर्तन केले. अखेर पीडितेने घडलेला प्रकार आईला सांगितल्यावर आईने शिक्रापूर पोलिसांकडे धाव घेतली.

दरम्यान, या प्रकराची माहिती तेथील युवकांना मिळाल्यानंतर त्यांनी शिक्षकाला चोप देत शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी जानकर विरोधात बलात्कार आणि बाललैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button