breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाहतुक पोलिस महिलेचा दुचाकीस्वाराकडुन विनयभंग

पिंपरी । प्रतिनिधी

एका वाहनावरून तिघे आल्याने वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचारी यांनी दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने वाहतूक पोलीस महिलेला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केला. तसेच पोलीस करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार शनिवारी (दि. 20) दुपारी फुगेवाडी चौक, दापोडी येथे घडला. याप्रकरणी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत वाहतूक पोलीस महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी वाहतूक पोलीस महिला शनिवारी दापोडी येथील फुगेवाडी चौकात वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी एका दुचाकी वरून तिघेजण आले. फिर्यादी यांना पाहून त्यातील एकजण काही अंतरावर उतरला. हा प्रकार फिर्यादी यांनी पाहिला.

त्यामुळे दुचाकीस्वार अन्सारी याला ट्रिपलसीट आल्याबाबत वाहतूक दंडाची पावती करण्यास सांगितले. त्यावरून दुचाकीस्वाराने ‘शरम करो तुम लोग. कितना झूट बोलते हो’ असे म्हणत अपशब्द वापरून वाहतूक पोलीस महिलेचा विनयभंग केला. तसेच फिर्यादी करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button