breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाल्हेकरवाडी – रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ६० बांधकामांवर कारवाई

पिंपरी – वाल्हेकरवाडी – रावेत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अडथळा ठरत असलेल्या सुमारे ६० बांधकामांवर कारवाई करण्यात आली.  पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण प्रशासनाने धडक कारवाई करत जागा ताब्यात घेतली. जवळपास ५४ व्यावसायिक बांधकामे व सहा निवासी घरांवर प्राधिकरण प्रशासनाने बुलडोजर फिरवला. तर काही नागरिकांनी  अतिक्रमण केलेली स्वत: बांधकामे हटविली.
या कारवाईच्या वेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश अहिरराव, झोन तीनचे क्षत्रिय अधिकारी अनिल दुधलवार, तहसिलदार वर्षा पवार, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे, उपनिरीक्षक प्रशांत महाले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सपना देवताळे, निगडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक काळूराम लोहकरे, प्राधिकरणाचे ४० कर्मचारी व चिंचवडचे ३५ पोलीस कर्मचारी उपस्थित होते. ४ जेसीबी, २ पोकलेन, ३ डंपरच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

शुक्रवारी (दि.१जून) सकाळी ९ वाजल्यापासून वाल्हेकरवाडी – रावेत मार्गावरील छत्रपती शिवाजी चौक ते दगडू चिंचवडे चौकापर्यंत (स्पाईन रोड टी जंक्शन) पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने प्राधिकरणाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने बांधकामे भुईसपाट केली. रस्त्याच्या रुंदीकरणाला अडथळा ठरत असलेल्या घरांना प्राधिकरणाच्या वतीने २६ मे रोजी अंतिम नोटिसा दिल्या होत्या. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून महापालिका आणि नवनगर विकास प्राधिकरण यांच्या वादात भूसंपादनाअभावी रावेत ते चिंचवड जुना जकात नाका या सहा पदरी मार्गावरील वाल्हेकरवाडी गावठाणापासून ते ओढ्यापर्यंतचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्याकरिता आवश्यक असणाºया जागेचे भूसंपादन करण्यासाठी वाल्हेकरवाडी येथील सर्व्हे क्रमांक ११५ ते १२१ मधील ६० बांधकामांना प्राधिकरणाने खाली करण्याच्या अंतिम नोटीस दिल्या होत्या. त्या अनुषंगाने सर्वे क्रमांक १२० आणि १२१ मधील बाधित घरांवर बुलडोझर फिरवून घरे भुईसपाट केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button