breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

वायसीएम रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू संशयाच्या भोव-यात ? नातेवाईकांचा रुग्णालयावर आरोप

पिंपरी – पिंपरीतील संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या पार्किंगसमोरील झाडीत 302 वाॅर्डातील रुग्ण मोहन देवराम सावंत (वय – 42) यांचा मृतदेह सापडल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.  सदरील घटना आज (गुरुवारी) दुपारी दोनच्या सुमारास वाॅर्ड बाॅयने त्या रुग्णास पाहिल्यामुळे उघडकीस आली.  दरम्यान, त्या रुग्णांचा वायसीएम रुग्णालयाच्या दुस-या मजल्यावरुन खाली पडल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. कारण, त्या रुग्णांची एक चप्पल दुस-या मजल्यावर आढळून आल्याचे एका डॅाक्टरांने सांगितले.  परंतू, सुरक्षेचा अभाव असल्याने या मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार मोहन देवराम सावंत, ( वय 42 रा.चक्रपाणी वसाहत भोसरी) यांना वायसीएम रुग्णालयात त्यांना 8 मे रोजी 302 मधील वाॅर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर अल्कोहोलीक विड्राॅलचे उपचार सुरु होते. मात्र, सदरील रुग्ण 9 मे रोजीच्या रात्री साडे आठ वाजल्यापासून वाॅर्डातून गायब झाला होता. याविषयी वायसीएम प्रशासनाने रुग्णांची मिसिंग तक्रार पोलिसांकडे केली होती.

परंतू, सदरील रुग्ण 10 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास वायसीएम रुग्णालयांच्या आेपीडी नंबर 28 च्या पाठीमागील बाजूच्या पार्किंगमधील झाडीमध्ये बेशुध्द अवस्थेत आढळून आला. त्यांच्या नातेवाईकांनी सुरक्षेचा अभाव असल्याने त्यांचा मृत्यूस रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप करुन बेशुध्द नव्हे तर मृतदेह आढळल्याचा आरोप केला आहे. याबाबत वायसीएम रुग्णालयाच्या डाॅक्टर म्हणाले की, सदरील रुग्ण अल्कोहोलीक विड्राॅलचा असल्याने त्यांचा उपचार सुरु होते. तो काल रात्रीपासून रुग्णालयातून गायब झाला होता. तशी तक्रार पोलिसांकडे देण्यात आली. त्या रुग्ण कुठे गेला याविषयी नातेवाईकांनी काहीच माहिती दिली नाही. त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. परुंतू, रुग्णालयातील दुस-या मजल्यावर पाहणी करताना त्या रुग्णांची एक चप्पल रुग्णालयाच्या दुस-या मजल्यावर आढळून आली आहे.  त्यामुळे रुग्णांचा इमारतीवरुन खाली पडल्याने मृत्यू झाला का? याबाबत पोस्ट मार्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर योग्य ते सांगता  येईल. अशी माहिती रुग्णालयातील डाॅक्टरांनी सांगितली.

दरम्यान, त्या रुग्णाचा मृतदेह वायसीएमच्या पार्किंगसमोरील झाडात आढळून आल्याने नातेवाईकांना हादरा बसला आहे. त्या रुग्णाला कोणी ढकलले की, त्याने स्वतः इमारतीवरुन उडी मारली? त्यांची कोणी हत्या केली का? याबाबत पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button