breaking-newsराष्ट्रिय

वाजपेयींपेक्षा पंतप्रधान मोदी दोन पावलं पुढे – एचडी देवेगौडा

नवी दिल्ली : जाहीर सभांमध्ये भाषण करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे नेते अटल बिहारी वाजपेयी यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत असे मत जनता दल सेक्युलरचे प्रमुख एच.डी.देवेगौडा यांनी व्यक्त केले. दोनच दिवसांपूर्वी देवेगौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले होते.

एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले कि, १९९७ साली काँग्रेसने जेव्हा माझे सरकार पाडले तेव्हा वाजपेयींना माझ्या सरकारला पाठिंबा द्यायचा होता. पण मी नकार दिला असे देवेगौडा म्हणाले. मला सत्तेचा लोभ नसून मी एक वेगळा माणूस आहे असे देवेगौडा म्हणाले. उत्तर प्रदेशच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवाने जसे वातावरण बदलले तसेच कर्नाटकाच्या निकालाने देशातील राजकीय चित्र बदलून जाईल असा विश्वास देवेगौडा यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button